तुळजापूर : मंहत वाकोजीबुवा मठ संस्थान तीर्थक्षेत्र तुळजापूरचा शिष्यग्रहण सोहळा शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी ६.१५ ते ८.१५ या कालावधीत मठात पारंपारिक पध्दतीने संत, मंहत, पुजारी, भक्तगणांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सकाळी मंहत वाकोजीबुवा मठात अन्नपुर्णा देवीच्या साक्षीने शिष्यग्रहण विधीस प्रारंभ झाला. यावेळी शहरातील ब्रह्मवृंदांनी मंत्रोपचार विधी संपन्न  केला. याप्रसंगी मंहत चिलोजीबुवा, मंहत मावजीनाथ, मंहत सोमवारगिरी, मंहत दत्तअरण्य महाराज आदी शहरातील प्रमुख मंहतगणांसह तुळजाभवानी देवीचे सेवेदार उपस्थित होते.
वाकोजी मठाचे मुख्य मठाधिपती मंहत तुकोजीबुवा यांनी मंहत वाकोजीबुवा मठाच्या पारंपारिक धार्मिक गुरु परंपरेनुसार श्रीतुळजाभवानी मातेच्या आज्ञा व  कृपेवरून वाकोजीबुवा मठ व कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी देवीच्या सेवेसाठी येथील मंहत पुजारी  शिवाजी किसनराव क्षीरसागर यांचे व्दितीय पुत्र बापुसाहेब शिवाजी क्षीरसागर यांचे मंहत वाकोजीबुवा गुरु तुकोजीबुवा या नामकरणाने शुभमुहुर्तावर शिष्यग्रहण करून शिष्यग्रहण (चेला)विधी संपन्न केला.
यावेळी शिष्य वाकोजीबुवाचे वडील शिवाजी क्षीरसागर सह आई, नातेवाईक उपस्थित होते. 

चेला विधी संपन्न झाल्यानंतर शिष्य वाकोजीबुवा आणि गुरु तुकोजीबुवा यांनी श्रीतुळजाभवानी व तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील मठ, मंदीर व पंचक्रोशीतील उपदेवतांच्या स्थळी जाऊन मनोभावे दर्शन घतले.

या शिष्यग्रहण विधी प्रसंगी अशोक मगर, प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, गोकुळराव शिंदे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन सांळुके, उपाध्यक्ष  विपीन शिंदे, प्रा काकासाहेब शिंदे, नागेश सांळुके, लालासाहेब मगर,   बब्रुवाहन पलंगे, दुर्गादास अमृतराव, किशोर गंगणे,  भिमराव कोळेकर, अॅड. शिरीष कुलकर्णी, अविनाश गंगणे, अजित क्षिरसागर,  राजामामा भोसले, विनायक क्षिरसागर यांच्यासह पुजारी वृंद आणि भक्तगण उपस्थित होते.

- दास पाटील, तुळजापूर

 
Top