कळंब (भिकाजी जाधव) :-
माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे काल दि. 15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. कळंब येथील छत्रपती शिवाजी चौकात वाजपेयी अमर रहे च्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी वाजपेयी यांच्या कविता वाचन करण्यात आले. सन 1978 साली वाजपेयी हे परराष्ट्र मंत्री असताना कळंब मार्गे अंबोजोगाई जातेवेळी कळंब येथे अटलबिहारी वाजपेयी यांचा सत्कार करण्यात आला होता. माजी नगरसेवक भैरु गुंजाळ, मुसाद्दीब काझी यांनी यावेळी ही आठवण सांगितली.
यावेळी माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ, बबनराव वाघमारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा. दिलीप पाटील, काँग्रेसचे रविंद्र ओझा, राष्ट्रवादीचे विलास करंजकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.के. कुलकर्णी, जेष्ठ नागरीक संघाचे महादेव महाराज अडसुळ, शेकापचे बाळकृष्ण धस, अशोक चोंदे, प्रकाश भडंगे, विलास मिटकरी, नगरसेवक सतिश टोणगे, शितल घोंगडे, माधवसिंग राजपूत, भाजपाचे सत्यपाल बनसोडे, संदीप बावीकर, मकरंद पाटील, सौ. निशा जोशी कळंबकर, शिवाजी गिड्डे, महेश जोशी, प्रशांत जोशी, विलास खांडेकर, सुधीर कोकीळ आदींनी श्रध्दांजली अर्पण केली.