उस्मानाबाद : युवांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा,युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत जिल्हा युवा पुरस्कार दिला जातो. सन 2018-19 चा जिल्हा युवा पुरस्कार (युवती ) उस्मानाबाद येथील कु सायली शशिकांत सलगर हिस स्वतत्रदिनी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते देण्यात आला.रोख रक्कम दहा हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद मध्ये तालुका समन्वयक म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी व्ही आर गमे,जिल्हा पोलिस अधीक्षक आर राजा,सीईओ डॉ संजय कोलते,आमदार सुजितसिंह ठाकूर,जिल्हा क्रीडा अधिकारी महाडिक आदी उपस्थित होते.
सायली सलगर यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल त्यांचे आई-वडील,नेहरू युवा केंद्र मधील अधिकारी यांनी तसेच नेहरू युवा केंद्र सोलापूर, सांगली येथील समन्वयक यांनी त्यांचे कौतुक केले आहे.