काटी :- :- तुळजापूर  तालुक्यातील काटी येथे शुक्रवार दि. (17 ) रोजी सकाळी दहा वाजता  येथील  ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने येथील  ग्रामपंचायत  कार्यालयात  "एक कुशाग्र, बुद्धिमान, समर्पित लोकनेता तसंच निस्वार्थी, निस्पृह आणि निष्णात राजकारणी, ख्यातनाम कवी, साहित्यिक, पत्रकार आणि खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न कै.अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या  प्रतिमेचे  पूजन करून  भावपूर्ण  श्रध्दांजली  वाहण्यात आली.  

           यावेळी  सरपंच आदेश  कोळी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,  माजी कृउबा. समितीचे  संचालक  सुजित हंगरगेकर,  पत्रकार उमाजी गायकवाड,  अतुल  सराफ, जितेंद्र  गुंड,  करीम बेग, चंद्रकांत  काटे, राजेंद्र  गाटे, भैरी काळे,  सुहास साळुंके,  बापू  वाडकर, प्रकाश  पांगे,शिवाजी  ताटे, दत्ता  सोनवणे, ज्ञानेश्वर  गुरव, सुनिल  गायकवाड,  कालिदास  शिंदे आदीसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

 
Top