लोहारा (इकबाल मुल्ला) :- 

लोहारा शहरातील शिवाजी चौकात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सर्व पक्षांच्यावतीने दि.17 ऑगस्ट रोजी भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी शहरातील शिवाजी चौकात भाजपा, शिवसेना, कॉग्रेस, रॉष्ट्रवादी कॉग्रेस, मनसे, रिपाइं, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका, भाजप मिडिया विभाग तालुका व ग्रामस्थ, व्यापारी वर्ग यांच्यावतीने दोन मिनिट स्तब्ध  राहुन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी सर्व पक्षांच्या प्रमुखांनी व ग्रामस्थांनी व जिल्हा मराठी पत्रकार संघ लोहारा तालुका व भाजप मिडिया विभाग लोहारा तालुका यांच्यावतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहुन मनोगत व्यक्त केले.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विक्रात संगशेट्टी,भाजप शहराध्यक्ष अशोक तिगाडे, ज्येष्ठ भाजपा नेते हाजी बाबा शेख, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष तथा भाजप मिडिया विभाग तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला,नगरसेवक तथा शिवसेना गटनेते अभिमान खराडे, युवा शिवसेना तालुका प्रमुख दिपक मुळे, नगरसेवक श्रीनिवास माळी, नगरसेवक शाम नारायणकर,सामाजिक कार्यकर्ते आयनोद्दीन सवार,युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, नगरसेवक प्रताप घोडके, माधव वकील, रिपाइं तालुका अध्यक्ष दिगंबर कांबळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नेताजी शिंदे, प्रशांत काळे, मनसे शहराध्यक्ष प्रविण संगशेट्टी, तलाठी जगदिश लांडगे, सुधीर घोडके, शंकर अप्पा मुळे, दगडु तिगाडे, प्रमोद पोतदार, बाळासाहेब पाटील, पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, शिवा बंडगर, अनिरुध्द जोशी, संतोष कुंभार, तानाजी घोडके, शिवकुमार पाटील, विजय फावडे, शरणप्पा शेखजी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, राजशेखर माणिकशेट्टी यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव, नागरीक, व्यापारी मोठया संख्येनी उपसथित होते. 

तसेच लोहारा तालुक्यातील अचलेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश लोखंडे, उपसरपंच गोरोबाई माळगे, ग्रामसेवक इंगळे, ग्रा.पं.सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समिती तत्र संचालक राजेंद्र पाटील, राजेंद्र सोलंकर, अनिलसिंग बायस, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश खंडाळकर, राजकुमार माळगे, भिम पाटील, संतोष पाटील, गुरुसिंग बायस, विजयकुमार आष्टगे, दिलीप पुजारी, चमनब्बा लोखंडे, महेश पाटील, महादेव सरसंबे, दिनेश बायस यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top