![]() |
डॉ.दापके-देशमुख दिग्गज |
लोहारा (इकबाल मुल्ला) :-
उस्मानाबाद शहरातील सुसज्ज सवेच्या माध्यमातून सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटल्सच्या मागच्या तीन वर्षांपासून तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रूग्नसेवा देण्यात यशस्वी झाल्यामुळे हाँस्पीटल मध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना (M.P.K.V.)सुरू केली आहे.
या योजनेमुळे उस्मानाबाद, सोलापूर, लातूर इ. जिल्ह्यातील पोलीस विभागातील कर्मचाऱ्यामध्ये आनंदानचे वातावरण निर्माणझाले आहे. पुर्वी उस्मानाबाद मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सेवा देणारे सुसज्ज असे हाँस्पीटल नव्हते त्यामुळे त्यांना उपचारासाठी सोलापूर,पुणे, मुंबई या ठिकाणी जावे लागत होते. परंतु आता सह्याद्री हाँस्पीटल्स उस्मानाबाद च्या माध्यमातून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य सेवेचा निश्चित लाभ होणार आहे.
उस्मानाबाद मध्ये ही योजना सुरू केल्यामुळे उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजास्वामी यांनी विशेष कौतुक केले आहे.
या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सर्व पोलीस कर्मचारी त्यांची मुले व आई-वडील यांच्यासाठी मोफत उपचार मिळणार आहेत.या योजनेअंतर्गत अपघात, ह्रदय विकाराचा झटका,फुप्फुसांचे आजार,रक्तदाब, धनुर्वात,घटसर्प, गँस्ट्रो,टायफॉईड, पोटदुखी,पोटांचे विकार,कँन्सर,मेंदूचे आजार,मेंदुचा झटका, इपिलेप्सी,फिट्स,मनक्याचे विकार,मानसिक ताण-तनावामुळे होणारे आजार,उष्माघात,ह्दयाविषयीचे आजारव शस्त्रक्रिया,कँन्सरची शस्त्रक्रिया,प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा,रसायनामुळे होणारी विषबाधा,डोळ्यांचे आजार,मुत्ररोग,मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथीचे आजार,व शस्त्रक्रिया,नाक-कान-घसा विषयीचे आजार,नवजात बालकांमध्ये जन्मतः असणारे व्यंग.व त्या विषयीच्या शस्त्रक्रिया,महीलांचे आजार,गर्भवती इ.आजारावर मोफत उपचार सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटल्स उस्मानाबाद येथे होणार आहेत अशी माहिती डॉ.दापके-देशमुख दिग्गज यांनी दिली.