बार्शी (गणेश गोडसे) :-
भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन जागेवरच मृत्यू मुखी पडल्याची घटना बुधवार दि. 22 रोजी सायंकाळी 7.35 वाजण्याच्या सुमारास बार्शी- तुळजापुर रस्त्यावर मुंढे वस्ती(बारस ओढा) येथे घडली.दिपक निवृत्ती बुद्रुक वय 45 रा.मळेगाव ता.बार्शी हल्ली राऊत गल्ली, बार्शी असे अपघातात मृत्यू मुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
शरद अंबऋषी बुद्रुक, वय - 34 रा.मळेगाव यांनी याबाबत पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि त्यांचे चुलते दिपक निवृती बुद्रुक हे बार्शी येथील झाडबुके कॉलेजवर शिक्षक म्हणून काम करतात व ते राऊत कॉलनी बार्शी येथे राहण्यास आहेत. सुट्टी दिवशी ते गावी त्यांचे मोटारसायकल mh13 CL1352 ने येत असत.
फिर्यादी हे 22 ऑगस्ट रोजी रात्रो 07/35 वा चे सुमारास गावातील बस स्थानकावरील हाॅटेल मध्ये चहा पित बसलेले असताना त्यांना बार्शी कडुन तुळजापुर कडे जाण-या एका अनोळखी मोटारसायकल स्वारने मुंढे वस्ती (बारस ओढा) जवळ ट्रक व मोटारसायकलचा अपघात झाला असल्याची माहिती दिली.ते मित्रासह अपघात स्थळी गेले असता हा प्रकार समोर आला.
मयत हे दिपक निवृती बुद्रुक हेच असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी अपघातग्रस्त ट्रकचा पाहीला असता तो नंबर एम 42 टी 4300 असा होता. ट्रकचालक अपघातानंतर पळून गेला होता.याबाबत पांगरी पोलिसात अज्ञात ट्रकचालकाविरूद्धश अपघात करूण एकाच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.