तुळजापूर : येथील नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी आशिषकुमार लोकरे रुजू झाले असून शुक्रवार रोजी त्यांनी आपला पदभार स्विकारला आहे. दीड महिन्यानंतर नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाला आहे.
    यावेळी प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांनी शाल, पुष्पगुच्छ देवून मुख्याधिकारी लोकरे यांचा सत्कार करून स्वागत केले. याप्रसंगी यावेळी गटनेते संतोष परमेश्वर, विजय कंदले, पंडित जगदाळे, सचिन रोचकरी, अमर मगर, सचिन पाटील, किशोर साठे, सुनिल रोचकरी, संतोष पवार, अश्विनी रोचकरी, अपर्णा नाईक, रेश्मा गंगणे, हेमा कदम, मंजुषा देशमाने, विनोद गंगणे, भारत साळुंके, नितीन इजाते, अमर राऊत आदीजण उपस्थित होते.

 
Top