बार्शी (गणेश गोडसे) :- 

पांगरी ता.बार्शी येथील वक्ते तथा लेखक प्रा.विशाल गरड आणि विरा मंडलिक या नवदाम्पत्याने लग्नावर होणारा अनावश्यक खर्च टाळून साखरपुड्यात विवाह केला.

गरड दांम्पत्याने बॅण्ड बाजा बारातीवर होणाऱ्या खर्चास फाटा देऊन त्यासाठी खर्च होणारी रक्कम चेकद्वारे केरळमधील पुरग्रस्तांना मदत म्हणून केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाठवली आहे. "तिथेही माझ्यासारखंच नवीन लग्न झालेलं दाम्पत्य असेल अशा पुर परस्थितीत त्यांचा सगळा संसार पाण्यात बुडाला असेल. त्यांच्यावर काय वेळ आली असेल याचा विचार करून मी हा मदतीचा निर्णय घेतल्याचे प्रा.गरड यांनी सांगितले. समाजप्रबोधनात फक्त विचार पेरून चालत नाही तर तशी कृती सुद्धा असावी लागते. प्रा.गरड यांनी घेतलेला हा निर्णय युवा पिढीला आदर्श आहे. लग्नाच्या नावाखाली लाखो रूपयाची उधळपट्टी करण्यापेक्षा समाजाला पथदर्शी असा विवाह सोहळा करून गरड यांनी एका चांगल्या उपक्रमाचा पायंडा पाडल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

 
Top