बार्शी (गणेश गोडसे) :-
चिंचोली (ता.बार्शी) येथील ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंचपदी गजराबाई उत्तम शिंदे तर उपसरपंचपदी दिलीप सुखदेव शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.चिंचोली ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या सरपंच, उपसरपंच निवडीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पांगरी चे मंडल अधिकारी उमेश डोईफोडे,गाव कामगार तलाठी सुनिल चंदनशिव,ग्रामसेवक शरद पवार,अंकुश मुंढे यांनी काम पाहिले. सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली त्यावेळी ग्रामपंचायत सदस्या सखुबाई कसबे,राजश्री ढेंबरे,सदस्य संदीप पाटील उपस्थित होते.अनिता दंडनाईक, ज्ञानेश्वर ढेंबरे हे सदस्य गैरहजर होते.निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत गावामध्ये निवडणूकीपुरते राजकारण केले जावे.गावच्या विकासाबाबत हेवेदावे न आणता गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रीत येऊन विकास साधला पाहिजे असे मत पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक शिवाजी पाडूळे यांनी व्यक्त केले.
निवड जाहीर केल्यानंतर नुतन सरपंच,उपसरपंच यांचा पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी विजयाचे शिल्पकार संतोष शिंदे,श्रीहरी शिंदे,अनिल घोलप,शिवाजी पाडूळे,उत्तम शिंदे,विशाल शिंदे,विजयकुमार शिंदे,बप्पा शिंदे,काकासाहेब शिंदे,अरविंद शिंदे,मधुकर कसबे,गणेश शिंदे,बापू शिंदे,बाळासाहेब शिंदे,महादेव पाटील,सुरेश शिंदे,प्रकाश शिंदे,रामलिंग कसबे,अनिल खुने,चंद्रभान कसबे,कल्याण शिंदे,मारूती जाधव,रमेश शिंदे,महेश शिंदे,गोरोबा ढेंबरे,रवि जाधव,श्रीकृष्ण शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
