बहिण भावाच्या पवित्र नात्याचा "रक्षाबंधन" हा सण सबंध भारतात मोठ्या उत्साहात साजरी होतो. हे अनेक पिढ्यापासुन व दशकांपासून आपण पाहतोय.
पण त्याच बरोबर आपली बहिण ही अबला आहे, कमकुवत आहे, निराधार आहे, असुरक्षित आहे म्हणून तिला आधार व संरक्षण देण्यासाठी"रक्षाबंधन" सणाची अख्याईका आपण ऐकतो. आणि वाचतोही आणि ही दंतकथा आपण चघळत तिचे रवंत करीत बसलोय, या सणामध्ये पुरष प्रधान संस्कृती चा फार मोठा पगडा असल्यामुळे आज माझ्या कित्येक कर्तृत्ववान बहिणींना अबलाचा गळ्यात पट्टा अडकाऊन बसावं लागतय. ज्याचं स्वतःला स्वताचं रक्षण करता येतं नाही, कुटुंबातील बायको पोरांचं रक्षण करता येत नाही, अंगात त्राण नाही, क्षमता नाही, समाजापासून दुर, कुटुंबापासुन दुर, बहिणीच्या कमाईवर, तिच्या ओळखीवर, तिच्या कर्तबगारीवर स्वताची उपजीविका भागवणारा हा बहिणीचा भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी मात्र "रक्षाबंधन" दिवसी तो राखी बांधुन घेण्यासाठी तत्पर असतो या अवस्थेत भावाकडून येणाऱ्या ओवाळणीची बहिणीने काय अपेक्षा करावी या भाकड कथा आज कुठेतरी बदलण्याची गरज वाटते.
आज माझी बहीण ही अबला नाही ती सबला बनलीय, प्रत्येक क्षेत्रात ती उत्तुंग भरारी मारत आहे, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्रांत ती अग्रेसर आहे, तीने हजारो आणि लाखो भावांना काम दिलयं, त्यांना आसरा दिलाय, जगण्याचे बळ दिलयं, मोठं मोठाले उद्योग व्यवसाय निर्माण केले आहेतच पण देश चालवण्याची क्षमता त्यांच्या अंगी निर्माण झाली असुन उत्तम प्रशासन चालवत आहेत, देशाच्या सिमेवर लढत आहेत आणि आपणास त्या संरक्षण देत आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, वैमानिक, तहसीलदार, वैज्ञानिक, प्राध्यापिका, प्राचार्या, वैद्यकीय अधिकारी अशे नाना पदे ती सक्षमपणे सांभाळत आहे, तीचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय, सक्षमीकरण झाले आहे हे न पाहता, समजावून न घेता तरीही आपण पुरुष प्रधानतेची महापुजा करून, महीलांना कमी लेखतो व अबला समजून पुरुष हा महिलेचे व भाऊ हा बहिणीचे रक्षण करतो ही मानसिक गुलामी आजच्या "रक्षाबंधन" सणानिमित्त तयार झाली असुन ते बदलण्यासाठी भावांने बहिणीला आणि बहिणीने भावाला राखी बांधु या, बहिण भावाचे व भाऊ बहिणीचे रक्षण करु या, आपल्या बहिणीला समान वागणूक देऊ, आपण तिला कमी नाही, जास्त नाही, पण समान समजु या, तिची इज्जत, तिचा सन्मान करू या आणि ही बहिण भवाचे पवित्र बंधन व पवित्र नाती टिकवू या
चला मग आज आपल्या सख्या बहिणी बरोबर आपल्या अवतीभोवती, परिसरात, समाजात, गावात अनेक कर्तबगार बहिणी दबा मारून बसल्या आहेत त्यांचा शोध घेऊ या , त्या खरोखरच अनेकांचे रक्षण करण्यासाठी पात्र आहेत तेंव्हा चला तर मग "आपणही आपल्या बहिणींना राखी बांधु या".
- ✍ दयानंद काळुंके, अणदुर
