उस्मानाबाद :- येथील मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या विदयार्थ्यांना श्रावणातील निसर्गरम्याचा आनंद घेता यावा, यासाठी येडशी येथील रामलिंग देवस्थान येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विदयार्थ्यांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. त्याचप्रमाणे रामलिंग पासून जवळच असलेल्या गुरुकुल येथे जावून त्या ठिकाणी चालणा-या अध्यायनापनाची माहिती जाणून घेतली. ब्रिटिशकालीन रेल्वेचे रेस्टहाऊस पाहून त्याची माहिती विदयार्थ्यांना देण्यात आली. त्याचबरोबर निसर्गातील विविध झाडांची ओळख करुन त्याचा मानव जीवनात उपयोग कसा होतो याची माहिती दिली.
