नळदुर्ग (प्रतिनिधी) :- सामाजिक बांधिलकीच्या भावनेने उस्मानाबाद येथे रविवार दि. 9 सप्टेंबर रोजी मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फुट) वाटप शिबीर आयोजित करण्यात आले असून ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त संख्येनी लाभ घेण्याचे आवाहन जि.प. सदस्य ॲड. धिरज पाटील यांनी शिरगापूर ता. तुळजापूर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या कार्यक्रमात केले.


तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार दि. 25 ऑगस्ट रोजी स्व. माणिकराव कदम-पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  प्रारंभी कै. माणिकराव कदम-पाटील यांच्या प्रतिमेच्या पुजनाने शिबीराचे उदघाटन करण्यात आले. या शिबिरात पुणे येथील देसाई हॉस्टिपल येथील तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. यावेळी 110 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी दहा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यावेळी विनायक जाधव बोलताना म्हणाले की, रुग्ण सेवा व देश सेवा करणारी लोक कमी असतात. पण धिरज पाटील यांनी सामजिक वसा हाती घेवून एक सामाजिक सेवा करण्याची धडपड करत असतात. अपंगांना मोफत कृत्रिम अवयव वाटप ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या या विविध उपक्रमांने सामान्य लोकांची चांगली सोयी होत असून ग्रामस्थांच्या वतीने जाधव यांनी ॲड. धिरज पाटील यांचे आभार मानले.



यावेळी सरपंच अंकुश कदम, विनायक जाधव, केशव जाधव, महेश गायकवाड, बब्रुवान कदम यांचयासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top