तुळजापूर :- नुसत्या जाहिराती करून थापा मारणाऱ्या व शेतकऱ्याला वाईट दिवस दाखवणाऱ्या या थापाड्या सरकारला हद्दपार करुन आगामी निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचा तिरंगा विधिमंडळावर फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन माजी मंत्री तथा तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांनी मंगरुळ ता. तुळजापूर येथे केले.
तुळजापूर तालुक्यातील येथे मंगरुळ येथे शनिवार दि. 25 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाचा बुथ कमिटी मेळावा संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार चव्हाण हे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अॅड. धिरज पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर, माजी जि.प. सदस्य मुकुंद डोंगरे, नगरसेवक सुनिल रोचकरी, सचिन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मंगरुळ ग्रामपंचायतचे सदस्य किसन डोंगरे, धनराज डोंगरे, अशोक बचाटे, बबन जाधव, पुरूषतम देशमुख, बाबा बचाटे, रसिक वाले, मंगरूळ चे युवा नेते मकरंद डोंगरे, बप्पा पाटील, बापू नन्नवरे, अभिजीत डोंगरे, बालिश डोंगरे, विकास डोंगरे, वसंत डोंगरे, अशोक लबडे, नशीब शेख, सत्यवान लबडे, बप्पा डोंगरे, मनोज डोंगरे, दिनेश डोंगरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.


