तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिरात दि. 29 जुलै रोजी सकाळी अभिषेक पुजेच्या वेळेस दुजाभाव करणा-या व तहसिलदार यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी तुळजापूर येथील आण्णासाहेब विश्वभंरराव भोसले यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सरव्यवस्थापक तथा तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, दि. 29 जुलै रोजी काही पुजारी सिंहासन पुजेपूर्वी अभिषेक पुजा करताना दिसून आले. वास्तविक पाहता सदरील प्रकार हे बेकायदेशीर असून अगोदर सिंहासन पूजा झाल्यानंतरच अभिषेक पुजा व्हायला पाहिजे. मात्र काही कमासदार पुजारी जाणीवपूर्णक अभिषेक रांगेची रांग संथगतीने चालवून अभिषेक चुकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर सदरील प्रकार दि. 29 जुलैच्या सिसीटीव्ही फुटेज मध्ये पाहून दोषी असणा-या सुरक्षा रक्षक कर्मचारी व कमासदार पुजारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.
निवेदनाची एक प्रत मंदीर संस्थानचे व्यवस्थापक व तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष यांना देण्यात आले आहे.