नळदुर्ग :- महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महासंघ कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी तीन दिवसीय लक्षणीक संप पुकारण्यात आला आहे. या संपात नळदुर्ग येथील कला, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या तात्कळ मान्य. करण्यात याव्यात जानेवारी 2016 रोजी ७ वेतन आयोग लागू केल्याची घोषणा केली होती. माञ अद्याप ७ वेतन आयोग लागू झाला नाही. ७ वेतन आयोगाची प्रत्यक्षात अंमलबजावणी दिलेल्या आश्वासनांणुसार लागू करण्यात यावी. जानेवारी २०१७ पासूनची महागाई भत्त्याची १४ महिन्याची थकबाकी आणि जानेवारी २०१८ पासूनची वाढीव महागाई भत्ता फ़रकाच्या रकमेसह मंजुर करा. सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्कळ भरा. शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदानित धोरण रद्द करा.निवृत्तीचे वय ६० वर्षे करा. व पाच दिवसांचा आठवडा लागू करा. सरकारी कामकाजातील खाजगीकरण व कंञाटीकरण बंद करा. आशा प्रलंबित विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात. राज्य शासनाने केवळ आश्वासने दिली आहेत. आता आश्वासन नकोत ठोस निर्णय हवेत. संपाची योग्य नोंद शासनाने घेऊन त्वरित निर्णय घ्यावेत अन्यथा बेमुदत संप अटळ आहे.