कळंब (भिकाजी जाधव) :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणी सह अन्य मागण्यासाठी दि.७, ८, ९ ऑगस्ट २०१८ च्या संपात सहभागी होत असलेबाबत कळंब तहसीलदार श्री अशोक नांदलगावकर यांना निवेदन दि.८ आगस्त रोजी  देण्यात आले.
मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी राज्यव्यापी संपाचे आवाहन केले असून, याचाच भाग म्हणून कळंब तालुका महाराष्ट्र राज्य प्राथमीक  शिक्षक संघाचे वतीने दि. ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी संपाचे आवाहन करण्यात आले होते. या मध्ये कळंब तालुक्यातील सर्वच शिक्षक सहभागी झाले असून, सातवा वेतन आयोग लागू करावा, २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, वरिष्ठ श्रेणी साठी दि २३/१०/२०१७ चा जाचक शासन निर्णय रद्द करावा, संगणक प्रशिक्षनास मुदतवाढ द्यावी, प्राथमिक शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्याचा गणवेश द्यावा. प्रत्येक केंद्राला संगणक ऑपरेटर द्यावा. ७ वी पर्यंतच्या शाळेला मुख्याध्यापक पद द्यावे या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, उस्मानाबाद जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एल बी पडवळ, सरचीटनिस संतोष देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कळंब तालुका शिक्षक संघाचे वतीने कळंब तहसील कार्यालय येथे तहसीलदार श्री अशोक नांदलगावकर यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर जिल्हा का.चीटनिस राजेंद्र बिक्कड, तालुकाध्यक्ष दत्ता पवार, कार्याध्यक्ष प्रशांत घुटे, कोशाध्यक्ष महादेव खराटे, सरचिटणीस उत्तरेश्वर शिंदे, सहचिटणीस सुधीर देशमुख, पतसंस्थेचे उपाध्यक्ष भूषण नान्नजकर, पतसंस्थेचे संचालक शिंदे सी जे, दिनेश अडसूळ, गणेश कोठावळे, नागेश टोणगे, महिला शिक्षिका श्रीम सुवर्णमाला डीकले, सुषमा हंडीबाग,  भास्कर चव्हाण, अण्णासाहेब चौधरी, मधुकर लिमकर,  प्रवक्ता प्रदीप रोटे, प्र.प्रमुख अखिल कुलकर्णी, संपर्क प्रमुखे प्रदीप (भैया) एडके, अविनाश पवार, निमंत्रक जगदीश नाईकवाडी, उपाध्यक्ष – सुनील बोरकर, अशोक डीकले, अप्पासाहेब कस्पटे, मुकुंद नांगरे, संजय गरड, चीटनिस – अनिल शिंदे, दीपक चाळक, भारत गवळी, जनार्धन धुमाळे, संघटक – दत्तात्रय वायकर, प्रदीप सर्जे, अण्णासाहेब चोंदे, नारायण बाकले, गोविंद फकीर, कोळी वाठवडा, बी एन चव्हाण, संदीप लोखंडे, हरिश्चंद्र होगले, संतोष काशीद, साबळे ऋषीकुमार, राजेश काळे, संतोष पवळ, पठाण, सूरवसे,सुर्यकांत वाघमारे, अविनाश खरडकर, प्रवीण लोमटे, राजेंद्र पवार, काडके जी जी आदी उपस्थित होते.

 
Top