बार्शी (गणेश गोडसे) :
गूळपोळी ता.बार्शी येथील महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक नागटिळक तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद ननवरे उपस्थित होते. यावेळी नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय चव्हाण बार्शी तालुका प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष गणेश लंगोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोरख दत्तू गाडे (गुळपोळी), अरविंद टोनगे (कोरफळे), हिरोजी शेळके (सुईं),संजय शेळके (सुई), रामचंद्र माळी (गुळपोळी), वर्धमान नरखडे (गुळपोळी), रामेश्वर लंबळे (अनगर), इत्यादी सैनिकांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक नागटिळक आणि प्रमुख पाहुणे विनोद ननवरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आजी माजी सैनिकानी, आपले अनुभव आर्मी बद्दलची माहिती सांगितली.त्याचबरोबर महामानव संस्थेच्या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आलेया भागातील पहिला उपक्रम आहे. असे उपक्रम केल्यामुळे सैनिकांचे मनोबल उत्साह वाढतो.
एक नवीन उर्जा मिळते रात्र दिवस भर देशाची सेवा करता जीवाची परा न करतात आपली जबाबदारी चोक पार पडतात. त्यामुळे आपला देश सुरक्षित आहे.प्रत्येकाच्या घरात एक तरी सैनिक पाहिजे त्याशिवाय सैनिकांचे महत्व कळणार नाही.अशा विविध विषयांवर सैनिकांनी आपलेमनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक नागटिळक यांचा सत्कार संस्था अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी केला तर प्रमुख पाहुणे विनोद ननवरे यांचा सत्कार गणेश लंगोटे यानी केला.