कळंब (भिकाजी जाधव) :-  दि. 23 ऑगस्ट रोजी कळंब तालुकास्तरावर विविध मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये   भालाफेक १७ वर्षे वयोगटातील स्पर्धेत जि.प.कन्या प्रशाला कळंब प्रशालेतील कु.अनिता अर्जुन ओव्हाळ ही प्रथम आली. तर  २००  मीटर धावणे मध्ये द्वितीय, १००मीटर कु.नयन बालाजी कळसाईत तृतिय, ४००मीटर रिले 

१)कु.कळसाईत नयन बालाजी 
२)कु.मोरे अंकिता अमोल
३)कु.घाटुळे निकीता बळीराम 
४)कु.आवटे राजनंदनी सतिष

तसेच जि.प. कन्या प्रशाला कळंब  चा संघ तालुका स्तरीय  बँडमिनंटन  स्पर्धेत मुलींच्या १७ वयोगटातुन  दुहेरी व एकल स्पर्धेत प्रथम  क्रमांक पटकावला.खेळाडूंना    श्री. ए.सी.जाधव श्री.डी.ओ.पवार यांनी मार्गदर्शन केले.  यशाबद्दल मुख्याध्यापक श्री.बी.डी.कदम सर व शाळा व्ययस्थापन समिती अध्यक्षा सौ.अनिता कदम  श्री.वाघमारे ए.बी., श्री काझी एच.एम श्रीम.आहिल्या भंडे, सुर्यकांत वाघमारे, एम.डी.सुद्देवाड, श्रीम.बी.पी. सावंत  श्री. अनंत तिडके, हाणुमंत झोंबाडे व श्रीम. सुक्ते यांनी अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल प्रशालेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top