तुळजापूर (दास पाटील) :- क्रीडा व युवा सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्यावतीने जिल्हास्तरीय शालेय रायफल व पिस्तुल शुटिंग स्पर्धा दि. 21 ऑगस्ट रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी सैनिकी शाळेच्या मैदानावर पार पडल्या. या स्पर्धेत नऊ विदयार्थिनी व नऊ विदयार्थी यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय शालेय रायफल व पिस्तुल शुटिंग स्पर्धेत आठ शैक्षणिक संस्थामधील 30 विदयार्थी व 15 विदयार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. रायफल संघटनेचे गणश जळके यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी स्पर्धकांचे जिल्हा क्रीडा अधिकारी महाडिक व क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे यांनी अभिनंदन केले. बिलकुले, पेटकर, क्षिरसागर, गरड, सिद्दीकी, युवराज नरे, देवकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
विभागीय स्पर्धेसाठी 14 वर्षे वयोगटातून मुलीमधून उस्मानाबादच्या विदयामाता हायस्कूलची सोयबा सिद्दीकी, यमगरवाडी ता. तुळजापूर येथील एकलव्य आश्रमशाळेचे तन्वी तोतडे, प्राजक्ता चौगुले, 17 वर्षे वयोगटातून प्रतिक्षा पवार, भक्ती ताटीकुंडलवार, वर्षा कुटकर, 19 वर्षे वयोगटातून आकांक्षा हाकारे, अपर्णा बनसोडे, भुमिका विभुक्ते, 14 वर्षे वयोगट मुलामधून पोदार इंटरनॅशनल स्कूल उस्मानाबादचा अयान अली सय्यद, एकलव्य आश्रमशाळेचा श्रीराम बंडगर, सागर खडसे, 17 वर्ष वयोगटातून विदयामाता हायस्कूलचा रेयान सिद्दीकी, भोसले हायस्कूलचा विक्रांत नरे, तुळजाभवानी सैनिक शाळेचा हर्षल बिलकुल, 19 वर्षे वयोगटातून एकलव्य आश्रशाळेचा विजय विभुक्ते, संदीप पवार, तुळजाभवानी सैनिक शाळेचा जीवन जमदार या विदयार्थ्यांची निवड झाली आहे.