तुळजापूर :- येथील जीवन विकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी आदित्य उल्हास बोरगावकर यांची तर सचिवपदी सुनिल चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
रविवार दि. 12 ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी आदित्य बोरगांवकर तर सचिवपदी सुनिल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक अशोक मगर, उल्हास बोरगावकर, अभिजित चव्हाण, वसंत सुर्यवंशी, मोहन भोसले, श्रीकृष्ण सुयर्वंशी, बिपीन डोंगरे, श्रीकांत कुलकर्णी, श्रेय कुलकर्णी आदीजण उपस्थित होती. यावेळी नूतन अध्यक्ष आदित्य बोरगावकर यांचा सत्कार आमदार मधूकरराव चव्हाण तर नुतन सचिव सुनिल चव्‍हाण यांचा सत्कार माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.



 
Top