नितीन तावडे
उस्मानाबाद -: मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्या अध्यक्षपदी नितीन तावडे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी माधव इंगळे यांना निवडण्यात आले आहे. 

रविवार, 19 ऑगस्ट रोजी समतानगर येथील मुक्तांगण शाळेच्या सभागृहात मसापचे मार्गदर्शक एम. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन कार्यकारिणीच्या निवडीचा कार्यकाळ जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार अध्यक्ष, सचिव यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. अध्यक्ष नितीन तावडे, सचिव माधव इंंगळे, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र अत्रे, रवींद्र केसकर, डॉ. प्रशांत चौधरी, संदिपान कुंभार, युवराज नळे, पंडित कांबळे, हनुमंत पडवळ, बालाजी तांबे आणि कमलताई नलावडे अशी आहे.

मार्गदर्शकपदी डॉ. अनार साळुंके, डॉ. रमेश दापके, एम. डी. देशमुख, भा. न. शेळके, माधव गरड, वा. मा. वाघमारे यांना कायम ठेवण्यात आले आहे. बैठकीस वामन जाधव, भा. न. शेळके, माधव गरड, तृप्ती अंधारे, सरोज कुलकर्णी, धनंजय निंबाळकर, रूपेश जावळे, जी. जी. कुंभार, राज कुलकर्णी, बाळासाहेब जमाले, वा. मा. वाघमारे, अरूण कोरपे, विजय गायकवाड, मधुकर हुजरे, बाळ पाटील, भागवत घेवारे, प्रशांत गरड, सुनील बडुरकर, डी. के. शेख, समाधान शिकेतोड आदी उपस्थित होते. 

 
Top