नळदुर्ग :- तुळजापुर तालुक्यातील खुदावाडी येथे जगविख्यात साहित्यसूर्य लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजन राष्ट्रवादीचे नेते अशोकभाऊ जगदाळे व तालुका कार्याध्यक्ष दयानंद मुडके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खुदावाडी गावचे उपसरपंच पांडुरंग बोंगरगे, माजी उपसरपंच शिवाप्पा जवळगे, माजी उपसरपंच गंगाधर चिंचोले, पोलीस पाटील बसवेश्वर सांगवे, मोहन नरवडे, श्रीधर नरवडे, गुरुनाथ राठोड, राजेंद्र ईटलकर, महेबुब शेख, सुरेश गामाजी, मचिंद्र जाधव व लहुजी ग्रुपचे सर्व पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते. 
 
Top