लोहारा (इकबाल मुल्ला) :-
    पुणे-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर ते कर्नाटक सरहद्द पर्यंत चालू असलेल्या रस्त्याचे काम संथगतीने व दर्जाहीन होत असल्याने उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांनी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेटू घेऊन या संदर्भात चर्चा केली.
राष्ट्रीय महामार्ग क्र.09 नविन 65 या महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम अपूर्ण आहे व झालेले काम हे अत्यंत दर्जाहीन आहे.यामुळे अपघात होऊन अनेक निष्पाप लोक मृत्यूमुखी पडत आहेत.सातत्याने पाठपुरावा करून सुध्दा या कामास योग्य ती गती मिळत नाही.व त्याचा दर्जाही सुधारला जात नाही. या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी.या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांनी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.याद्वारे केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.व संबंधित ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
 
Top