तुळजापूर :- मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आज (९ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. यास श्री क्षेत्र तुळजापूर शहरात व तालुक्यात उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापा-यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा दिला. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर परिसर व मुख्य बाजारापेठात शुकशुकाट असल्याचे दिसून आले.
तुळजापूर येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन शहरातील मुख्य रस्त्यावरुन सकल मराठा समाज बांधवानी रॅली काढली. याशिवाय तालुक्यात अनेक गावांमध्ये दुकाने व बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.
व्हिडिओ पहा -
 |
| तुळजापूर मार्गावरील गंधोरा पाटीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
|
 |
नळदुर्ग बसस्थानकात आज असा शुकशुकाट दिसून आला.
|
 |
| सलगरा दि ता. तुळजापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
|
 |
| धानुरी येथे शंभर टक्के बंद
|
 |
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी येथे असा शुकशुकाट दिसून आला |