लोहारा (इकबाल मुल्ला) :-
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्रबंदला लोहारा शहरात व तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत, समाजासह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. लोहारा शहरासह तालुक्यातील सास्तुर, माकणी, जेवळी, कानेगाव, कास्ती, भातागळी, हिप्परगा रवा, आष्टामोड, आष्टा कासार, धानुरी, नागुर, सालेगाव, तावशीगड, यासह अनेक गावे कडकडीत बंद ठेवून आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा दिला.
सकाळी सर्व जातीधर्माच्या नागरिकांना बंदचे आवाहन केले.त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवली. लोहारा शहरातील बसस्थानकासमोर टायर जाळुन आंदोलकांनी तिव्र भावना व्यक्त केली.
शिवाजी चौकात आंदेलक एकत्र आले व शहरातील मुख्य रस्त्याने रॅली काढुन तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून मुख्यंत्री यांच्या नावे आरक्षण मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे कि,मराठा आरक्षणासाठी बलिदान झालेल्यांच्या नातेवाईकांना शासनाने 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी,तसेच कुटुंबातील एकास शासकीय सेवेत सामावून घ्यावे,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरबी समुद्रातील पुतळ्याची उंची एक इंच ही कमी करू नये,आरक्षणाच्याया लढ्यात मराठा व इतर समाजातील व्यक्तीवरील सर्व खोटे गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत,तसेच मराठा,मुस्लीम, धनगर व लिंगायत समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे यासह आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.
या आंदोलनाला सर्व पक्षीयांनी पाठींबा दिला.पोलीस निरिक्षक सर्जेराव भंडारे,पोलीस उपनिरिक्षक गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिवाजी चौकात लोहारा ठाण्याच्या वतीने आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
या आंदोलनात राहुल पाटील,किशोर साठे,अशोक भाऊ जवळगे,अमोल पाटील,नितीन पाटील,शिवाजी अप्पा कदम,अँड.दादासाहेब पाटील,बाळासाहेब पाटील,शाम नारायणकर,मोहन पणुरे,शब्बीर गवंडी, आयुब अब्दुल शेख,मुक्तार चाऊस,अविनाश माळी, आरीफ खाणापुरे,दादा मुल्ला,हरी लोखंडे,नेताजी गोरे,प्रकाश भगत,वंदना भगत,शितल राहुल पाटील, अश्वीनी पाटील, शरीफा सय्यद,नाजमिन शेख,रंजना आसुरे,गिरीश भगत,नेताजी शिंदे,सलीम शेख,महेबुब गवंडी,लक्ष्मण रसाळ,राम मोरे,विजय लोमटे,विठ्ठल साठे,नितीन पाटील,श्रीकांत भरारे,विष्णु नारायणकर, आस्लम खानापुरे,तानाजी पाटील,आयुब हबीब शेख, उमेश गोरे,नरदेव कदम,शरद कदम,परमेश्वर सुर्यवंशी, बाबुराव कदम,दत्ता जावळे पाटील,आश्फाक शेख, ताहेर पठाण यांच्यासह मराठा,धनगर,मुस्लीम, लिंगायत,समाजातील नागरीक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरात व तालुक्यात पो.नि.सर्जेराव भंडारे यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.