बीड : आज शनिवार दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी बीड येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सदरील मोर्चास सुरुवात झाली. मोर्चामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. या मोर्चात शिक्षिकाही मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या.