नळदुर्ग :- येथील भुईकोट किल्ल्यात किल्ले नळदुर्ग या पुस्तिकेचे प्रकाशन सोहळा अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते शनिवार रोजी संपन्न झाला. यावेळी व्यंकटेश जोशी आपसिंगकर लिखित किल्ले नळदुर्ग या पुस्तिकेत किल्ल्यातील श्री खंडोबा मंदीर, गणपती महाल याबाबतचा उल्लेख न केल्याने धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणाने संतप्त शिवसैनिकांनी भर कार्यक्रमातच अभिनेत्यासमोर जाहिर निषेध करुन राडा केला. यावेळी शिवसैनिकांनी पुस्तक फाडून पायदळी तुडविले. तर शहरातील चावडी चौकात शिवसैनिकांनी किल्ले नळदुर्ग पुस्तकाची होळी केली.