बार्शी (गणेश गोडसे) :- 
बार्शी येथील बसस्थानकावर दुचाकी भी करूण हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांने दुचाकीच लंपास केल्याची घटना बार्शी बसस्थानकावर घडली.
अशोक राजेंद्र खळे वय 51 वर्षे, रा. शिवशक्ती मैदानाचे पाठीमागे, बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि ते परांडा जि.उस्मानाबाद येथील पंचायत समिती कार्यालयात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दैनंदिन कामा करीता एम एच 26,एस 9544 ही दुचाकी खरेदी केली होती.ते सदर दुचाकी घेऊन त्यांच्या मित्रांना भेटण्या करीता बार्शी बस स्थानकावर आले होते. बस स्थानकावर आल्या नंतर सदरची दुचाकी बस स्थानकावरील सार्वजनीक सुलभ शौचालयासमोर उभी करूण चहा पाण्या करीता हाॅटेलमध्ये गेले. परत आल्यानंतर सदर ठिकाणी लावलेली मोटार सायकल त्यांनी उभी केलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही.त्यांनी दुचाकी शोधली असता ति मिळून आली नाही.अज्ञात चोरट्यांने दुचाकी चोरून नेल्याप्रकणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
 
Top