लोहारा (इकबाल मुल्ला) :
    लोहारा ते जेवळी जाणाऱ्या रस्त्यावर भानुदास चव्हाण महाविद्यालय समोर अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या वाहनाचा पंचनामा करीत असताना भरधाव येणाऱ्या वाहनाने तलाठ्यास धडक देवुन गंभीर जखमी केले. हि घटना दि.6 ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजाण्याच्या सुमारास घडली आहे.

    पोलीस सुत्राकडुन मिळालेली माहीती अशी कि,
लोहारा ते जेवळी जाणाऱ्या रस्त्यावर भानुदास चव्हाण विद्यालयासमोर अवैध्य वाळुच्या गाडीचा पंचनामा करीत असताना दि.6 ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजायच्या सुमारास महेंद्र पिक अप गाडी क्र.MH. 25 P. 4689 चा चालक सैफन बहादुर शेख रा.कार्ले ता.तुळजापुर यांनी भरधाव वेगाने निष्काळजीपणाने वाहन चालवुन फिर्यादीस व तलाठी विद्यादर कोळी यास जोरात धडक दिल्याने यात तलाठी विद्यादर कोळी गंभीर जख्मी झाले. यास दोन्ही हातास, उजव्या पायास, छातीस, डोक्यास जबर मार लागला आहे.तलाठी विद्यादर कोळी यांच्यावर शहरातील ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सोलापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.याबाबत लोहारा पोलीस ठाण्यात लोहारा तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.यावरुन आरोपी पिक अप वाहन चालक सैफन बहादुर शेख याच्याविरुध्द लोहारा पोलीस ठाण्यात कलम 279,337,338, भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.नि.सर्जेराव भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एस.बोदमवाड हे करीत आहेत.
 
Top