अणदूर -:  तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शुक्रवारी झालेल्या भरगच्च ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्षपदी सिद्धाराम  (अप्पू) धमुरे, उपाध्यक्षपदी जितेंद्र कानडे तर सचिवपदी ज्ञानेश्वर घुगे यांची अविरोध निवड झाली. याचवेळी ग्रामसभेने अवास्तव  असलेल्या दोन मागण्या एकमताने फेटाळल्या.     

अणदूर ता. तुळजापूर येथील प्रभात मंडळ सभागृहात शुक्रवार दि.२४ रोजी झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सरिता मोकाशे या होत्या. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष माणिकराव आलुरे, उपाध्यक्ष कल्याणी मुळे, सचिव राजेंद्र स्वामी व सहसचिव ईमाम शेख या माजी पदाधिकाऱ्यासह धमुरे,कानडे व घुगे या नुतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माणिकराव आलुरे व राजेंद्र स्वामी यांनी गतवर्षीच्या कार्याचा आढावा मांडून सविस्तर मार्गदर्शन केले अरविंद घोडके यांनी प्रास्ताविक केले. ग्रामविकास अधिकारी डी.ए. चव्हाण यांनी  मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे,अपंग व्यक्तींचे लाभ, ग्रामस्वराज्य अभियान, वृक्षलागवड व संगोपन जनजागृती, १४ वा वित्त आयोग याबाबत सविस्तर चर्चा करून  टाळ्यांच्या गजरात मंजुरी घेतली. यावेळी येथील गुरुवारच्या आठवडी बाजार दिवशी कोणतेही आंदोलन करण्यात येवू नये तसेच अंबाबाई मंदिरालगतच्या मोकळ्या जागेचा प्रात:विधीसाठी वापर होत असल्याने ती जागा ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी अशी मागणी होताच अनेकांनी संताप व्यक्त केला व एकमताने  या अवास्तव मागण्या फेटाळण्यात आल्या. ग्रामस्थांच्या विवीध प्रश्नांना ग्रामविकास अधिकारी  चव्हाण यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या सभेस उपसरपंच आप्पाराव मुळे यांच्यासह बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्य तसेच श्रीमंत मुळे,दिपक घुगे,सुरेश लंगडे,आनंद Vमुळे, आर.एस. गायकवाड,अप्पासाहेब शेटे, राजेश देवसिंगकर,नागनाथ चौधरी, साहेबराव घुगे आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
 
Top