पुणे :- बंजारा समाजास एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी पोस्ट मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे शुक्रवार दि. 24 ऑगस्ट रोजी धनकवडी पुणे येथे कुलदीप थावराजी काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

यावेळी काळे यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधुन स्वागत करण्यात आला. या वेळी सुधीर फेटा मेकर्स चे बाबुराव चव्हाण, राष्ट्रीय बंजारा मिशन मिडीया प्रमुख वसंत जाधव, बंडु जाधव, नितेश जाधव, कृष्णा चव्हाण, राजविर राठोड, ईश्वर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.




बंजारा समाज हा संपूर्ण भारतात विस्तारला असून 12 राज्यात या समाजास एससी चे आरक्षण तर 5 राज्यात एसटी चे आरक्षण आहे. मात्र महाराष्ट्र राज्यात या समाजास व्हीजेएनटी प्रवर्गाचे आरक्षण आहे. संपूर्ण देशात एक समा व एकच एसटी आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रीय बंजारा मिशन कार्यरत आहे.

यावेळी  कुलदीप काळे व वसंत जाधव यांनी सर्व गोर बंजारा समाजाला एसटी आरक्षण कडे नेण्यासाठी या पोस्ट कार्ड अभियानाचा बराच फायदा होईल असे सांगून सर्व गोर बंजारा बांधवांनी 50 पैसे चे कार्ड अभियानात सहभाग घेऊन गोर बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी सहयोग करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.



 
Top