कळंब (भिकाजी जाधव) :-

 उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हापरिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ही केवळ शिक्षकांच्या योगदानामुळे व त्यांनी केलेल्या परिश्रमामुळेच वाढली असल्याचे गौरवोद्गार जिल्हापरिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांनी काढले. 

दि 24 रोजी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा येथे आयोजित केलेल्या गोविंदपुर केद्रातील शिक्षकांच्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत ते बोलत होते. गोविंदपुर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बाळकृष्ण तांबारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शिक्षणपरिषदेस जिल्हा परिषद सदस्य श्री ज्ञानेश्वर राजगुरू उपस्थित होते. या परिषदेस श्री कांतीनाथ ढोले,बाबासाहेब पवार, प्रदीप रोटे, गणपती तपिसे, यांनी बहुमोल मार्गदर्शन केले या प्रसंगी केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक श्री एच. पी कनकवाड, भाटशिरपुरा शाळेचे मुख्याध्यापक श्री भास्कर चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले की शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी सातत्य ठेवणे आवश्यक आहे, जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ तसेच या वर्षी बदल्यामुळे विस्थापित झालेल्या व जिल्हाबदलुन आलेल्या शिक्षकांच्या गैरसोयीच्या बदल्या दुरूस्त करण्यासाठी राज्यशासनाकडे परवानगी मागितली असून शासनाची मान्यता आल्यानंतर त्यांची सोय केली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली, विद्यार्थ्या -विद्यार्थ्यात भेदभाव निर्माण होऊ नये यासाठी या शैक्षणिक वर्षापासून जिल्हापरिषदेने इयत्ता 1 ली ते 8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी 64 लाख रुपयाची शेष मधुन तरतूद केली आहे पुढील वर्षा पासुन राज्याशासना प्रमाणे आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.

या वेळी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा येथे सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहीती घेऊन कौतुक केले, शाळेतील शिक्षकांनी सात लाख रुपये लोकवाटा जमा करून शाळा डिजिटल केली तसेच शाळेची रंगरंगोटी, ट्रिगार्ड, परसबाग, वृक्षलागवड, हँन्डवाँश स्टेशन, चप्पलस्टँन्ड , शाळेचा परिसर व स्वच्छता पाहुन समाधान व्यक्त केले शिक्षकांनी भाटशिरपुरा शाळेचा आदर्श घेऊन आपल्या शाळा पण अशा स्वरुपाच्या शाळा तयार कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

शिक्षण परिषद यशस्वी कळण्यासाठी श्री संजय झिरमिरे, सचिन तामाने, दिलीप पवार, शहाजी बनसोडे  यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळकृष्ण तांबारे यांनी तर सूत्रसंचालन अविनाश पवार व आभार संजय झिरमिरे यांनी मानले.
 
Top