नळदुर्ग शहरातील युनूस शेख भाई यांचे ब्रेन ड्रेन मुळे निधन झाले त्याचे अवयवदान केल्याचे कळाले. त्यांच्या परिवारा बदल आभिमान वाटतो. कारण मुलगा गेलेले दुःख न करता परिवारांनी अवयवदानांची तयारी दाखवली व अवयवदान केले. ही अवयवदानाचे कार्य सोपे नाही, निर्णय घेणे सुद्धा सोपे नाही, काळजावर दगड ठेवून हा निर्णय त्यांच्या  कुटूंबांनी घेतला असेल ते नळदुर्ग शहरात प्रथमच अवयवदान निर्णय घेणारे कुटूंब ते हि मुस्लिम कुटूंब दान देणारा व घेणारा जात बघणार नाही माणुसकी हिच एक जात आहे. 

मरणानंतर केलेले अवयवदान हे महान कार्य आहे. त्यांनी केलेला अवयवदानामुळे चार लोकांना जीवदान मिळाले. एक जीव तर जाणारच होता परंतू जाता जाता चार जणांना जीवदान दिले म्हणजे चार कुटूंबाला जीवदान मिळाले त्यांच्या हदयाने ते पुन्हा श्वास घेतील त्यांच्या डोळयांनी ते पुन्हा हे जग पाहतील. आपल्या मरणानंतरही आपण अवयवदानाने जिवंत राहू शकतो हि कल्पना खुप छान आहे. फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे मातीचे शरीर मातीतच मिसळणार होते. त्यांच्या कुटूंबांनी एक आदर्श सर्वासमोर ठेवला आहे. दुःख पर्वता ऐवढे असले तरी दुसऱ्याच्या दुःखात त्यांना आनंदी करण्यात इतका मोठा अवयवदानाचे पाऊल उचलले. अभिमानाची गोष्ट आहे हि एक सामाजिक बांधिलकी आहे. आपण समाजाचे कांही देणे लागतो, अवयवदान हे सर्वोत्तम दान आहे. सर्वानी त्याचा विचार करावा. अक्षरवेल महिला साहित्य मंडळ कडून शब्दरूपी भावपूर्ण श्रध्दांजली.

- कविता रमेशराव पुदाले नळदुर्ग

 
Top