नळदुर्ग :- दिवस-रात्र जनतेची सेवा करणार्‍या नळदुर्ग पोलिसांना बोरामणी (जि. सोलापूर) येथील ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल व जूनियर कॉलेज येथील विद्यार्थिनीनी बांधल्या राख्या.

भावा-बहिणीची अतूट अशी  रेशीमगाठ व संस्कृती टिकवण्यासाठी ग्लोबल व्हीलेज पब्लिक स्कूल व जूनियर कॉलेजच्या वतीने राखीपोर्णिमा सण साजरा करण्यात आला. ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय......’ असे बिद्र पोलीसांच्या खाकी वर्दीवर लावलेले असते यांचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेवून ‘खल” वृत्तीने वागणा-यांना ठेचण्याचे काम पोलिस करतात. अहोरात्र जनतेची सेवा करणार्‍यांना आपल्या बहीणीकडे जाण्यासाठी सुध्दा सुट्टी मिळत नसावी व बहिणीची माया आज राखी बांधून विद्यार्थिनीनी पूर्ण केली. यावेळी पोलिसांचे डोळेसुद्धा पाणावले व ते भावनिक झाले होते. 

पोलिसांना कामाचा आतिरिक्त ताण व त्यांचे आरोग्याकडे लक्ष दयायला आज त्यांच्याकडे पुरेसा वेळ मिळत नाही तसेच त्यांचा घराकडे, नातेवाईकाकडे भेटण्यासाठी जाण्यास त्यांना सुट्टी सुद्धा मिळत नसावी हा धागा पकडुनच ग्लोबल व्हीलेजच्या विद्यार्थिनीनी बहिणीची माया आपल्या रक्षणकर्त्याला कमी पडू नये म्हणून नळदुर्ग येथील पोलिस स्टेशन मध्ये जावून  औक्षण करत त्यांना राखी बांधल्या व तसेच त्यांना आरोग्याच्या दृष्टीने चिक्की वाटपाचाही कार्यक्रम करण्यात आला. तोंड गोड करण्यासाठी कोणत्याही गोड पदार्थापेक्षा विद्यार्थिनी नी चिक्की ची निवड केली. चिक्की मध्ये गूळ व शेंगदाणे असल्याने ते शरीरास लाभदायक असते. जेणेकरून आपल्या शरीरातील रक्ताची योग ती काळजी घेत हेमोग्लोबिन स्थिर ठेवण्यासाठी मदत होईल, अशी आरोग्याची काळजीपूर्वक माहितीसुद्धा विद्यार्थिनीनी आपल्या रक्षणकर्त्या भावास दिली॰

कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान यांच्या वतीने असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक सलोखा राखण्याचे काम केले जाते. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जूनियर कॉलेज चे प्राचार्य विनिल जांभळे, पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शीतल रजपूत, नदाफ ए. एम, शेख ए. आर,जळकोटे, एम.एम, बिराजदार, आर.बी, रगबले अंजली, पुराणिक वैष्णवी, दहिटणे महानंदा, वैशाली कोंडा, ननवरे चंद्रशेखर, धोत्रे सागर, घुगले अप्पासाहेब यांनी परिश्रम घेतले. व यावेळी कु. भारती जेवळे, अंकिता कोरे, शुभांगी सूरवसे ,श्रुतिका हेले,रेणुका सूरवसे , दिव्या पोतदार,लक्ष्मी गुरव,विनायक बेडगे,शिवानी तोरखडे, मयूरी मोहिते इत्यादी विद्यार्थिनीनी संस्थेच्या वतीने राखी बांधण्याचे सुचविले व त्या कार्यात त्या यशस्वी ठरल्या. 

  सदर कार्यक्रमाची संस्थेच्या सचिवा सौ. संगीता शहा-चनशेट्टी व अध्यक्ष प्रा. डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्याचे कौतुक करत अशा कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात उजाळा द्यावा असा महत्वपूर्ण सल्ला दिला.

 
Top