बार्शी (गणेश गोडसे) :-

बार्शी तालुक्यातील 115 ग्रामपंचायती पेपरलेस करण्यास यश आले असुन लवकरच  ऊर्वरीत ग्रामपंचायतीचे कामकाज पेपरलेस करण्यात येईल अशी माहीती बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

सर्वच ग्रामपंचायतीचे कामकाज पेपरलेस करून संगणीकृत करण्याचे शासनाचे धोरण असून या धोरणाच्या अंतर्गत बार्शी पंचायत समितीने आघाडी घेतली असून 130 पैकी 115 ग्रामपंचायतीचे कामकाज पेपरलेस करण्याचा मान मिळवला आहे. जिल्ह्यातील 402 पेपरलेस ग्रामपंचायत पैकी सर्वाधिक 115 पेपरलेस ग्रामपंचायती बार्शी तालक्यातील आहेत.

ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचा धोरणाअंतर्गत ग्रामपंचायतीचे 1 ते 23 नमुने रेकॉर्ड तसेच ग्रामपंचायतीचे नमूना नंबर 8 (मालमता नॉदी) व नमूना नंबर 9 ( करमागणी यादी ) संगणीकृत केली जाते यामुळे सर्व प्रकारचे दाखले उतारे तसेच अहवाल संगणीकृत मिळू शकतात तसेच करमागणी बिले सुद्धा संगणीकृत होऊन कामात पारदर्शकता येण्यास मदत होते. सेवा हमी कायदा तसेच माहिती अधिकार कायद्याची अमलबजावणी करणे सुलभ होते. वेळेची बचत होऊन कामाची गती वाढण्यास मदत होते.

पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, पंचायतसमिती सदस्य, तालुका व्यवस्थापक, सरपंच ग्रामसेवक,केंद्र चालक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायती कमी कालावधीत  जास्त संखेने पेपरलेस करता आल्या. ऑगस्ट 2018 अखेर सर्व 130 ग्रामपंचायती पेपरलेस करण्यात येणार असून यापुढे ग्रामपंचायतीचे कामकाज मोठ्या प्रमाणावर संगणीकृत होणार आहे.

बार्शी तालुक्यातील भयरे, बोरगाव खुर्द, धानोरे, गाताचीवाड़ी, महागाव, मांडेगाव, मिर्जुनपुर, पुरी, संगमनेर, शेळगाव (व्हळे), तुर्कपिंपरी , उंबरगे, उंडेगाव ,झाडी, वैराग ही गावे अद्याप पेपरलेस झालेली नाहीत.

 
Top