बार्शी (गणेश गोडसे) :-
बार्शी येथील श्रीराम विवेक वर्धिणी मंडळ,बार्शी संचलित शेठ मु.व.ज. साधना कन्या प्रशाला येथे विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी व समाज ऋण या उदात्त भावनेतून शिक्षकांच्या मार्यदर्शनाखाली केरळ राज्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्ती करीता सहाय्यता निधीचे संकलन केले आहे.
तहसिलदार ऋषिकेश शेळके, संस्था अध्यक्ष रामचंद्र सोमाणी, कार्याध्यक्ष उज्वल सोमाणी, सचिव नवल सोमाणी, द्वारकादास सोमाणी, डॉ. निनाद माढेकर,नेताजी सोलवट यांच्या उपस्थितीत संस्था, शिक्षक व विद्यार्थी यांनी संकलन केलेला सहाय्यता निधी रु.५९,०००/- या रकमेची चलन भरणा प्रत तहसिलदार ऋषिकेश शेळके यांचेकडे देण्यात आली.यावेळी मातहसिलदार श्री.शेळके यांनी प्रशालेमध्ये ख-या अर्थाने मूल्यशिक्षण दिले जात असून विद्यार्थिनींनी समाजाचे ऋण उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमासाठी साधना कन्या प्रशाला, साधना प्राथमिक, शिशुविहार मधील सर्व शिक्षक, शिक्षकतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच यावेळी तहसिलदार यांनी समाजातील सर्व स्वयंसेवी संस्थांनी देखील यामध्ये सक्रिय योगदान द्यावे असे प्रशासनासच्या वतीने आवाहन केले.
