बार्शी (गणेश गोडसे) :-

पुणे येथे असलेले घर विकण्याच्या कारणावरूण बाप-लेकाने मिळून आईस मारहाण करून जखमी केल्याची घटना मिर्झनपुर ता.बार्शी येथे घडली. आशा भारत घुगे (वय-40 रा-वडगाव (बु)सिंहगड रोड डिगे टॉवर समोर पुणे) यांनी याबाबत आपले पती व मुलाच्या विरोधात वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

भारत  आनंदराव घुगे व रणजित घुगे अशी महिलेस मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बाप-लेकाची नावे आहेत. जखमी आशा घुगे या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि त्या मोठा मुलगा रणजित,धाकटा मुलगा विश्वजीत व नवरा भारत असे एकत्रात राहणेस आहेत  मोठा मुलगा रणजित याने प्रेमविवाह केला आहे.त्यानंतर मोठा मुलगा रणजित व नवरा भारत हे फिर्यादीस नावावर असलेले पुण्यातील घर विकुन टाक म्हणुण सतत भांडण करुन शिवीगाळ करतात. 

फिर्यादीचे ह्या त्यांच्या दिराच्या मयतेस भालगाव येथे  आल्या होत्या. त्या तेथुन त्यांच्या माहेरी वडिलांचे घरी मिर्जुनपुर ता.बार्शी येथे गेल्या होत्या.नवरा भारत व थोरला मुलगा रणजित तेथे आले व पुण्यातील घर विक नाहीतर आम्ही तुला जीव मारुन टाकु अशी धमकी देऊन भांडण करुन दमदाटी करत होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी एकट्याच घरी असताना पती भारत यांनी फिर्यादीस तु पुण्यातील घरे विकणार नाही तर आम्ही आज तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून  लाथाबुक्कयांनी मारहाण केली व दाराजवळ असलेली कडाप्पाची फारशी हातात धरुन त्यांच्या  पाठीवर पोटावर व डोक्यावर उजव्या बाजस मारली व मुलगा रणजित यानेही शिवीगळी व दमदाटी करुन हाताने व लाथाबुक्कयाने मारहाण केली. आवाज ऐकूण वडील खंडु लक्ष्मण जाधवर हे घरात आले.त्यांचेपाठोपाठ चुलत भाऊ  जाधवर व शेजारील सुषमा संतोष दराडे हे घरात आले व आमचे भांडण सोडवासोडव केली.याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून बापलेकावर वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 
Top