बार्शी (गणेश गोडसे)  :-

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब बार्शी च्यावतीने ऐच्छिक रक्तदान चळवळ गतीमान करण्यासाठी रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान शिबिरात बार्शी शहर व परिसरातील सुमारे १०१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सैनिक व शहिदांना आगळी वेगळी श्रध्दांजली अर्पण केली.

श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या स्व. डॉ. आण्णासाहेब कश्यपी सभागृहात सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन बालरोगतज्ज्ञ ला. डॉ.हरिष कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अॅड. असिफ तांबोळी व क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात लायन्स क्लब बार्शीचे अध्यक्ष ला. बापूसाहेब कदम म्हणाले, लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी सामाजिक संस्था असून देशभरात लायन्स क्लबचे मोठे जाळे आहे. गरजंनी मदत करण्याबरोबरच विविध समाजोपयोगी उपक्रमही क्लबच्या माध्यमातून वर्षभरात राबविण्यात येतात. लायन्स क्लब बार्शी च्यावतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मागील ३६ वर्षापासून अखंडीतपणे रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविला जातो.

त्या माध्यमातून लायन्स परिवाराशी रक्तदात्याचे नाते जोडण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी लायन्स क्लबचे सर्व तरूण पदाधिकारी कार्यरत असून तरूणांना काम करण्याची मोठी संधी आहेरक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.बापु कदम, सचिव ला. महेंद्र कथले, खजिनदार ला. लखन राजपूत, उपाध्यक्ष ला. राहुल साखरे, ला. अक्षय बडवारला. अड. दिनेश श्रीश्रीमाळ व नूतन सदस्य संदिप नागणे व लायन्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
 
Top