मुरुम :- उमरगा तालुक्यातील मुरूम शहरातून रविवार दि. 26 ऑगस्ट रोजी सांयकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुर्णाकृती पुतळ्याची वाजतगाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे आणि विद्यमान नगरसेविका सुमनताई देडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
अण्णाभाऊ साठे चौकातून सुरुवात झालेली ही मिरवणूक पुढे अशोक चौक,टिळक चौक,किसान चौक,सुभाष चौक,गांधी चौक,हनुमान चौक मार्गे होत रात्री परत अण्णाभाऊ साठे चौकात विसर्जित झाली.
डॉल्बी च्या तालावर तरुणाई थिरकत असताना मात्र या मिरवणुकीत सहभागी झालेल्या खुडूस ता माळशिरस येथील हलगी वादक संघाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या मिरवणुकीत मुरूम शहर व परिसरातील मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
व्हिडिओ पहा -
