मुरुम :- उमरगा तालुक्यातील येथील प्रतिभा निकेतन विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विदयार्थी स्पर्धकांनी नुकत्याच पार पडलेल्या तालुका स्तरीय विविध स्पर्धत घवघवीत यश संपादन केले.
बलसूर ता उमरगा येथील नंदूराम आश्रम शाळेत दि रोजी तालुका स्तरीय शालेय कबड्डी (पावसाळी) स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धत १७ वर्षीय वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम तर १९ वर्षीय वयोगटातील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावले. जिल्हा स्तरावरील स्पर्धांसाठी मुलींच्या संघाची निवड झाली.तसेच दि रोजी कदेर ता उमरगा येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धत १४,१७ व १९ या तिन्ही वयोगटातील स्पर्धकांनी प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांची जिल्हा स्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली.त्याचप्रमाणे गुंजोटी ता उमरगा येथील श्रीकृष्ण विद्यालयात दि रोजी पार पडलेल्या बॅटमिंटन स्पर्धेत १७ व १९ वयोगटातील मुले व मुली यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याने जिल्हा पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या सर्व विध्यार्थ्यांना क्रीडा सचिव राजेंद्र सोलंकर,क्रीडा विभाग प्रमुख प्रा.नारायण सोलंकर,उपमुख्याध्यापक धनराज पवार,क्रीडा शिक्षक सुजीत शेळके आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्ल आमदार बसवराज पाटील,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील,जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील,माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे,उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार,प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिकचे प्राचार्य काशीनाथ मिरगाळे,उपप्राचार्य सुधीर अंबर,प्रतिभा निकेतन सेवक पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब पाटील,उमरगा पंचायत समितीचे माजी सदस्य उल्हास घुरघुरे,डॉ.भिलसिंग जाधव आदींनी त्यांचे विशेष कौतुक करुन अभिनंदन केले.
