युनुस शेख
नळदुर्ग : येथील रहिवासी असलेले व उस्मानाबाद शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक युनुस सत्तार शेख यांचे आपघातानंतर ब्रेन डेड झाले आसून त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय कुटूंबियानी घेतला आहे. १९ ऑगस्ट रोजी सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील शिरवळ येथे झालेल्या अपघातात युनूस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

अवयव दानाची प्रक्रिया बुधवारी सोलापुरातून पार पडली. यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला आहे. बुधवारी खरे तर बकरी ईद. मुस्लीम बांधवांचा सण. याच दिवशी मेंदू मृत झालेल्या मुस्लीम तरुणाचे अवयवदान करण्याचा निर्धार त्यांच्या कुटुंबीयांनी केला.

युनूस यांची एक किडनी, स्वादुपिंड, डोळे हे अवयव पुण्याच्या सहयाद्री हॉस्पिटलला रवाना होणार आहेत. यासाठी ग्रीन कॉरिडॉर राबविण्यात येणार आहे. १९ ऑगस्ट रोजी सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील शिरवळ येथे झालेल्या अपघातात युनूस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तुळजापूर, उस्मानाबाद येथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरात आणण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशिरा त्याची तपासणी केली असता मेंदूमृत झाल्याची घोषणा अश्विनी रुग्णालयाने केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मेंदू मृत रुग्ण यूनुस यांची एक किडनी, स्वादुपिंड, डोळे या अवयवाचे दान करण्यास मान्यता मिळाली. एक किडनी व स्वादुपिंड पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलला रवाना होणार आहे. ससून रुग्णालयास लिव्हर, शासकीय रुग्णालय सोलापूर येथे दोन डोळे तर एक किडनी सोलापूरच्याच अश्विनी रुग्णालयातील रुग्णास प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. युनूस यांच्या पश्चात तीन  मुले, पत्नी, भाऊ, आई असा परिवार आहे.
 
Top