लाेेहारा (इकबाल मुल्ला) :- 

     मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु प्रायमरी अँड हायस्कुल ख्वाजानगर उस्मानाबाद येथे दि. 4 ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ई- लर्निंग क्लासचे उदघाटन व निवृत्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
    यावेळी डॉ. अंजली नितीन काळे यांच्या हस्ते ई - लर्निंग क्लासचे उदघाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख म्हणुन मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु प्रायमरी अँण्ड हायस्कुलचे चेअरमन हाफीज अलीमोद्दीन,जहीर काझी,बिलाल काझी,अदि उपस्थित होते.
    यावेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.व तसेच शासकीय सेवेतुन निवृत झाल्या निमीत्त आदर्श शिक्षक *हाशम सर,नसरीन मैडम,मेराज मैडम* यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top