लोहारा (इकबाल मुल्ला) :
शासनाने लिंगायत धर्मास संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा,अशा विविध मागण्यांसाठी लोहारा तहसील कार्यालयासमोर दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता लिंगायत समाज बांधवाच्यावतीने इष्टलिंग पुजा आंदोलन करण्यात आले.
इष्टलींग पुजा आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन लिंगायत समाजाच्यावतीने तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे कि, लिंगायत धर्मास संवैधानिक मान्यता व लिंगायत समाजास आरक्षण या मागणीसाठी बऱ्याच वर्षापासुन शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.या मागण्या प्रलंबीत आहेत.तरी या मागण्या शासनाने मान्य कराव्यात.व शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे,सन 2016 — 2017 पिक विमा न मिळालेल्या पिकास तात्काळ विमा मिळावा,तालुक्यात ज्या गावात लिंगायत धर्मियांसाठी स्मशानभुमी नाही,त्या ठीकाणी त्यांच्यासाठी स्मशानभुमि उपलब्ध करुन द्याव्यात, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.
या आंदोलनात संगण्णा स्वामी,विजय फावडे, नागण्णा वकील,अँड. विश्वनाथ पत्रिके,शंकर जट्टे,विठ्ठल वचने पाटील,हरी लोखंडे,अमोल बिराजदार,के.डी.पाटील,विक्रांत संगशेट्टी, अँड.संगमेश्वर माशाळकर,वैजिनाथ माणिकशेट्टी,राजशेखर माणिकशेट्टी,मलिकार्जुन पाटील,गुंडप्पा भुजबळ,डॉ.चंद्रशेखर हंगरगे,बाळु माशाळकर,मंगेश बनशेट्टी,सचिन तोडकरी,नागेश तोडकरी,दयानंद स्वामी,शिवा स्वामी,बापु जट्टे, यांच्यासह शहरातील व तालुक्यातील लिंगायत समाज मोठ्या संख्येने सहभागी होता.
व्हिडिओ पहा -