काटी :- तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील   येडेश्वरी कन्या प्रशाला  प्रशालेचा  14 वर्ष वयोगटातील हॉलीबॉल संघ  होर्टी येथे सोमवार  दि. 20 ऑगस्ट राेजी झालेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम आला आहे. 

या हॉलीबॉल  संघात कु. श्रध्दा हंगरकर, सायली जवळगावकर,  संज्योती खरात, शिवानी काळे, सानिका  थोरबोले, दिक्षा भापकर, राणी खरात, ऋतीका भोसले, निलावती हजारे, साक्षी  धायगुडे,  वैष्णवी  कुलकर्णी  या खेळाडूंनी  सहभाग  नोंदविला होता.  या सर्व खेळाडूंचे त्यांचे प्रशिक्षक तथा क्रिडाशिक्षक श्री कदम डी.आर. यांचे मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संस्थेचे अध्यक्ष तथा सोलापूरचे  माजी महापौर  श्री मनोहर  सपाटे,  व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया पाटील, सहशिक्षक सुनिल  खेंदाड,  गणेश गुंगे, किशोर  बनसोड,  तुकाराम  गवळी  यांच्यासह पालक, ग्रामस्थांनी यशस्वी  खेळाडूंचे  अभिनंदन केले.

 
Top