काटी :- नुकत्याच उस्मानाबाद जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उस्मानाबाद येथील क्रीडा संकुलात संपन्न झाल्या.

तुळजापुर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य आश्रम शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवले, यामध्ये 14 वर्षे वयोगटात विवेक म्हेत्रे याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 17 वर्षे वयोगटात अजिनाथ जाधव याचा चौथा क्रमांक आला. दोघांचीही विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.

त्यांच्या या यशाबद्दल खेळाडू आणि मार्गदर्शक अशोक बनकर, अनिल घुगे, गणेश जळके आणि क्रीडा शिक्षक महादेव शेंडगे, बालाजी क्षीरसागर यांचे संस्थेच्यावतीने डॉ. सुवर्णा रावळ, डॉ. अभय शहापुरकर, महादेव गायकवाड, रावसाहेब कुलकर्णी, विजय वाघमारे, चंद्रकांत गडेकर, गिरीश कुलकर्णी, मदन कुलकर्णी, नरसिंग झरे, सतीश कोळगे, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णा कोल्हटकर यांनी अभिनंदन केले.
 
Top