नळदुर्ग :- येथील ऐतिहासिक किल्ल्यात शनिवार रोजी व्यंकटेश जोशी आपसिंगकर लिखित "किल्ले नळदुर्ग" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राणाजगजितसिंह पाटील हे होते. तर व्यासपीठावर अभिनेते मिलिंद गुणाजी, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अजित खंदारे, जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोलते, जेष्ठ साहित्यिक विनय आपसिंगकर, नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे, लेखक व्यंकटेश जोशी आपसिंगकर, राष्ट्रवादीचे सुरेश देशमुख, युनिटी कंपनीचे मुख्य संचालक कफील मौलवी, भरत जैन, जयधवल करकमकर, गपार काझी, नगरसेवक शहबाज काझी, दयानंद बनसोडे, सिराज काझी, शब्बीर कुरेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा युनिटी कंपनीच्यावतीने सत्कार करण्यात आले.


 
Top