तुळजापूर (दास पाटील) :-
येथील झुंजार हनुमान मंदीरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन, प्रवचन व भारुडाचे आयोजन केले आहे.
या जन्माष्टमी सोहळ्यास सोमवार दि. २७ पासून प्रारंभ होत आहे. यात दि. २७ रोजी श्रीकृष्ण मूर्तीपूजन, ज्ञानेश्वरी ग्रंथपूजन, तुकाराम गाथापूजन यासह श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे.
दि. २७ आॅगस्ट रोजी ह.भ.प. नारायण महाराज, उंब्रज, दि. २८ आॅगस्ट रोजी ह.भ.प. सोपान महाराज, आळंदी, दि. २९ आॅगस्ट रोजी ह.भ.प. विजय बाळ सराफ महाराज, जुन्नर, दि. ३० आॅगस्ट रोजी ह.भ.प. अरुण महाराज आळजापूर, दि. ३१ आॅगस्ट रोजी ह.भ.प. दिपक मेटे महाराज, केज, दि. १ सप्टेबर ह.भ.प. जालंधर नरवडे महाराज, नगर, दि. २ सप्टेबर रोजी ह.भ.प. गणेश बरंगे महाराज पंढरपूरकर यांची किर्तन सेवा रोज रात्री ९ ते ११ या कालावधीत संपन्न होणार आहे.
दि. ३ सप्टेबर रोजी सकाळी दिंडी मिरवणूक होऊन ह.भ.प. ज्ञानेश्वर माळी महाराज नंदूरबार यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
त्यानंतर दहीहंडी सोहळा संपन्न होणार असून यशस्वी दहीहंडी संघास कै. सुरेश (आप्पा) पाटील यांच्या स्मरणार्थ नितीन रोचकरी यांच्या वतीने ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
तसेच या सप्ताहकाळात संपूर्ण दिवसभरात पहाटे ४ ते रात्रौ १ वा. पर्यंत काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन, प्रवचन, हरिपाठ, किर्तन, भारूड, भक्तीगीत, हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
तरी तुळजापूर शहर व परिसरातील भाविक भक्तांनी या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संपन्न होत असलेल्या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन झुंजार हनुमान मंदीर समिती, दिपक संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
