तुळजापूर  : कुमार नाईकवाडी

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर कुष्ठरोग रोगी शोध मोहिम राबावावित येणार आहे. तरी तुळजापूर तालुक्यात उपजिल्हा रूग्णालय ही मोहिम दि.24 सोमवार पासून संपूर्ण तालुक्यातील घरोघरी जाऊन महिती देऊन कुष्ठरोगीची तपासणी करून त्या विषयी महिती दिली  जाईल. तरी आपल्या घरात तशा व्यक्ती असल्यास सांगणे गरजेचे आहे, असे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) उस्मानाबाद  वैदयकीय अधिक्षक डॉ. एच.व्ही.होनमाने यांनी सांगितले.

ते पुढे बोलाताना म्हणाले की, आपल्या घरी येणा-या कर्मचारी तसेच स्वयंसेवक यांना तपासणी साठी सहकार्य करून आपल्या अगांवरील फिक्कट,पांढरे न खाजणारा न दुखणारा बधीर चट्टा हातापयाला मुण्या येणे अशी लक्षणे असतील तर तपासणी करून घेणे.असे म्हणाले या वेळेस ता.अधिकारी डॉ. आर.के.अन्सारी हे उपस्थित होते.
 
Top