हैद्राबाद :- तेलंगणा राज्यातील जगतियालमधील कोंडागट्टू घाटात तेलंगणा राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात होवून 45 प्रवाशांचा मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. तर १८ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळण्यापूर्वी चार वेळा पलटी झाली. त्यानंतर ती दरीत कोसळली. या अपघाताबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दुखः व्यक्त केले आहे. त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

ज्या बसला अपघात झाला आहे ती बस जगत्याळ जिल्ह्यातील टीएसआरटीसी डेपोची आहे. या बसमधून ६२ भाविक प्रवास करत होते. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 45 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित जखमी झाल्याचे वृत्त आहे. बसमधील सर्व भाविक श्री आंजनेय स्वामी मंदिरात दर्शनासाठी चालले होते. 

दुर्घटनेची माहिती मिळताच जगतियालचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सिंधू शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

 
Top